तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी ‘पुस्तकी पंडित’ नव्हते, तर ‘कृतिशील विचारक’ होते, हे या पुस्तकामधून लक्षात येईल…
तर्कतीर्थ ‘अमुक विचारवादी’ असे विधान लोक अज्ञानापोटी, एकांगी अभ्यासाने करत असावे असे वाटते. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ असा हा वैचारिक विकास होय. त्या अर्थांनी ते मला ‘अज्ञेयवादी’ वाटत आले आहेत. अधिक उन्नत ज्ञान, अवस्था, तत्त्व, स्थिती, स्थान इत्यादीचा शोध त्यांचे लक्ष्य वाटत आले आहे. ‘थांबला तो संपला, कायदा पाळा गतीचा’ म्हणणारा हा प्राज्ञपुरुष प्रतिभेच्या बळावर नित्य नवज्ञान, नवविद्या, नवप्रज्ञेच्या शोधात दिसतो.......